Bhosari

पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहर उपाध्यक्षांचा विनयभंग करणाऱ्या भोर भाजपच्या तालुका अध्यक्षाची अटक करुन जामिनावर सुटका

By PCB Author

October 30, 2018

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या ४० वर्षीय शहर उपाध्यक्षांचा विनयभंग करणाऱ्या भोर भाजपचे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने  यांना आज (मंगळवार) भोसरी एमआयडीसी पोलीसांनी अटक करुन जामिनावर सुटका केली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर आज बऱ्याचशा महिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आरोपी देशमाने याच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून निदर्शने केली होती. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीसांन तपासचे चक्र फिरवत तातडीने देशमाने यांच्यावर कारवाई केली.

एका सामाजीक कार्यक्रमा दरम्यान पीडितेची आणि भोर भाजपचे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांची ओळख झाली होती. यावेळी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर देखील घेतले आणि व्हॉट्सअॅपवर बोलत देखील होते. मात्र महिलेने देशमाने यांना मेसेज करण्यास मनाई केली होती तरी सुध्दा ते महिलेला मेसेज करत होते. रविवारी (दि.२८) रात्री देशमाने यांनी पुन्हा महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आज भोसरी पोलीसांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी देशमाने याला अटक केली. मात्र लगेचच जामिनावर सुटका देखील केली. यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सुर आहे.