Pimpri

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा

By PCB Author

October 18, 2018

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे विशेष परिवहन कार्यालयात कार्यरत  असलेल्या महिलेने  याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली होती त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुबोध मेडशीकर असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडितेने दिलेल्या तक्रारीमध्ये मेडशीकर यांनी पीडित महिलेसोबत असभ्य वर्तन केले. त्यांनी कार्यालयात कार्यरत असणार्‍या महिलेचे फोटो काढले; तसेच त्या काम करत असताना अंगाला स्पर्श होईल, असे उभे राहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक केली. त्याच्यासोबत जेवण्यासाठी संबंधित महिलेवर दबाव टाकला. स्वछतागृहाकडे जात असताना, हात पकडून ‘करिअर’ संपवण्याची धमकी दिली. मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने आरोपीने महिलेला मेमो दिले. शेवटी वैतागलेल्या महिलेने बुधवार (दि. १७) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे तपास करत आहेत.