पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते

0
1143

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले मात्र आयुक्तालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम, आयुक्तालयासाठी लागणारे बजेट, मनुष्यबळ आणि वाहनांच्या मागणीसाठी आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना वारंवार मुंबईला खेटे मारावे लागत आहेत.

सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्यात असल्यामुळे इतर ही बाबी जसे कि आयुक्तालयासाठी लागणारे बजेट, मनुष्यबळ आणि वाहनांची मागणी शासनाने पूर्ण करावी, यासाठी आज (मंगळवार) मुंबई येथील महासंचालक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुणे शहर आणि पुणे ग्रामिणचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे पुणे ग्रामिण आणि पुणे शहरातील मनुष्यबळ आणि वाहने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला देणे अपेक्षित होते. मात्र काही प्रमाणात मनुष्यबळ पुरवून हात अकडण्यात आला. तांत्रीक आणि प्रशासकिय अडचणींमुळे हवे तेवडे मनुष्यबळ आणि वाहने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला प्राप्त झाले नाहीत. आयुक्त पद्मनाभन यांनी यावर काहीसा तोडगा काडून टिम पध्दतीने काम करुन वेळ मारुन नेली. मात्र ही परिस्थिती कायम टिकणारी नाही. सध्या पोलीस कर्मचारी डबल डुटी करुण हैराण आहेत. तर आयुक्तालय सुरु करण्यात अति घाई झाल्याने या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निगतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.