पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन

0
1738

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रशासकीय कामकाज स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आले असून संकटसमयी पोलीस  मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पोलिसांच्या कोणत्याही मदतीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करावा लागणार आहे. त्यासाठी १०० या क्रमांकाबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

* पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे कार्यालय –  ०२० – २७४५ ०४४४ / २७४५०५५५

* अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय – ०२० – २७४५०१२५

* पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक व दोन) – ०२० – २७४८७७७७

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :-

०२० – २७४५०१२१

०२० – २७४५०१२२

०२० – २७४५०६६६

०२० – २७४५ ०८८८

०२० – २७४५८९००

०२० – २७४५ ८९०१