पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

625

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पुणे पोलीस आयुक्तालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात सहायक पोलीस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. गुरुवारी (दि.१४) याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी काढले.

सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश जयसिंग धामणे, नीलेश दत्ता वाघमारे, जगन्नाथ महादेव बनसोडे, दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी, राजू रामचंद्र ठुबल आणि उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाता काम करत असलेल्या या आठ अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. तर आधिच पोलीस कर्मचाऱ्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कमतरता आहे,  असे असताना या म्हत्वाच्या पदावरील आठ अधिकाऱ्यांची बदली का करण्यात आली असे सवाल उपस्थित होत आहे. काही अधिकाऱ्यांचे म्हणने आहे कि, या अंतर्गत बदल्या आहेत. पुढील काही दिवसात पुणे पोलीस आयुक्तालयातील देखील काही पोलीस अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली केली जाणार आहे.