Pimpri

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई

By PCB Author

October 18, 2020

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 350 जणांवर शनिवारी (दि. 17) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत.

सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे पालन न करणा-यांवर आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे. दंड न भरल्यास थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. शनिवारी निगडी, आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच रावेत चौकीच्या हद्दीत एकही कारवाई करण्यात आली नाही.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई – एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (25), पिंपरी (40), चिंचवड (18), निगडी (0), आळंदी (0), चाकण (46), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (14), सांगवी (35), वाकड (91), हिंजवडी (16), देहूरोड (22), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (7), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (4)