Pimpri

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 128 जणांवर खटले

By PCB Author

September 25, 2020

पिंपरी,दि.25(पीसीबी) – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 24) शहरातील 128 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.  गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात 784 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे शहरात आजवर कोरोना बाधितांचा आकडा 73 हजार 260 एवढा झाला आहे जवळपास पाऊण लाखाच्या घरात हा एकदा गेला असून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 30 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत. गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई – एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (3), पिंपरी (10), चिंचवड (11), निगडी (7), आळंदी (13), चाकण (1), दिघी (8), सांगवी (16), वाकड (16), हिंजवडी (20), तळेगाव दाभाडे (2), रावेत चौकी (3).