पिंपरी-चिंचवड पोलिसही आता ट्‌विटरवर

463

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांशी संपर्क करता यावा तसेच पोलिसांचे उपक्रम, सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ट्विटर अकाउंट सुरु केले आहे.

नागरिक आणि पोलीस यांच्यातील संपर्क वाढावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच नागरिकांना त्यांच्या सूचना, तक्रारी पोलिसांकडे मांडता याव्यात, पोलिसांच्या कामगिरीची माहिती नागरिकांना मिळावी तसेच आयुक्तालयाची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आता ट्विटर अकाउंट सुरु केले आहे. Pimpri Chinchwad Police असे ट्‌विटरचे प्रोफाईल नाव असून @PCcityPolice नाव या नावाने हे अकाउंट सुरु करण्यात आले आहे.