Pimpri

पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक

By PCB Author

June 25, 2018

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझुकी एसएइ सुप्रा इंडिया २०१८’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये  सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली.

नवी दिल्ली, ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट फॉर्म्युला रेसींग ट्रॅक येथे झालेल्या सातव्या मारुती सुझूकी एसएई सुप्रा इंडिया २०१८ स्पर्धेत यावर्षी देशभरातून आयआयटी, एनआयटीसह १२६ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

या टीममध्ये कुशल ढोकरे (कॅप्टन), प्रतिक वायकर, अभिषेक पाटील, प्रफुल्ल भोसले, सुबोध म्हसे, विरेंद्र निचित, राघवेंद्र मानिकवार, शुभांग डिगे, मोहित मारु, शिवकुमार मिरजगावे, परम देसाई, शुभम पाटील, प्रभंजन शेळके, ऋषिकेश कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, गोपाल काब्रा, आदित्य पाटील, तेजस कराड, रौनक गुप्ता, राहुल औताडे, सर्वेश देशमुख, राहुल कन्नावर, श्रेयश पदमावार, आकाश नांदिर्गी, आहम मेमन, संकेत कामत, नैनेश देसले, शांतनू दाहसकर, मोहनिश पोटू, आकाश शिंदे, पुरुषोत्तम दोशी, निरंजन तारले, साहिमान देशमुख, कृष्णाई मुंढे, पुजा नरवाडे, समाधान दोर्गे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रा. अमोल सुर्यवंशी व प्रा. निलेश गायकवाड हे टीम क्रेटॉस रेसींगचे फॅकल्टी अडव्हाईजर म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहेत. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.