पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयातील 27 पोलीस एकाच दिवशी कोरोना बाधित

0
279

पिंपरी, दि.8 (पीसीबी): आयुक्‍तालयातील 27 पोलीस बुधवारी (दि. 8) दिवशी कोरोना बाधितपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील 27 पोलीस बुधवारी (दि. 8) दिवशी कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेत, असे पोलीसही आता बाधित येऊ लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत एकूण 97 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 26 जण पूर्णपणे करोना मुक्‍त झाले आहेत. तर 68 जणांवर शहरातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर तीन जणांचे घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. बाधित आलेल्यामध्ये 13 अधिकारी आणि 84 कर्मचारी यांचा समावेश आहे.

बुधवारी 27 पोलीस करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर भोसरी पोलीस ठाण्यातील 189 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवालही लवकरच येणार आहे. पोलिसांना झोपडपट्टी भागात जाऊन बंदोबस्त द्यावा लागत आहे. तसेच अनेकजण पोलीस ठाण्यात कामासाठी येत असतात. पोलीस ठाण्यातही स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याने त्यामुळे करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.