पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित

0
770

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक नियंत्रण कक्ष आज (बुधवार) पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. हा कक्ष वाकड येथील जुन्या पोलीस ठाण्यातील इमारतीत सुरु करण्यात आले असून पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून स्वतंत्रपणे वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु करण्याचे काम सुरु होते. यामुळे नियंत्रण कक्षासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. शहरात वाहतूकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात होत होती. आता वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु झाल्यामुळे वाहतूक समस्यांवर त्वरीत तोडगा काडून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सध्या वाहतूक नियंत्रण कक्षाला स्वतंत्र संपर्क क्रमांक मिळालेला नसून मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करुनच वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येणार आहे; अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.