Pimpri

पिंपरी चिंचवडला कोरोना बाधिताची संख्या ५५७

By PCB Author

July 14, 2020

पिंपरी,दि.14 (पीसीबी):पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेली आकडेवारीनुसार एकूण करोना बाधित संख्या आता ८,१७१ पर्यंत पोहली आहे. आज मयत झालेल्या ११ व्यक्ती आहेत.

आज कोरोना बाधिताची संख्या ५५७ झाली आहे. एकूण कोरोना मुक्त ४,८७९ आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णाची संख्या १,९४२ आहे.

पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण १४ तर, पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण २४२ आहेत. एकूण मयत १७३ आहेत.

एकूण सॅम्पल ३७,१७२ तर, अहवाल प्राप्त ३५,३१६ असल्याचे पालिकेने सांगितले. आज रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णाची संख्या २,२०४ आहे.