पिंपरी-चिंचवडमध्ये ११ दिवसात स्वाइन फ्लूचे ५ बळी

0
809

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूमुळे  दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला  आहे. तर गेल्या ११ दिवसात स्वाइन फ्लूचे ५ बळी गेले आहेत. त्यामुळे  सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार घ्यावेत,  असे आवाहन  महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

शहरामध्ये सध्या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. आकुर्डीतील ५६ वर्षीय व्यक्तीचा  अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

शहरात आतापर्यंत  एकूण ८ जण स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास महा  पालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही  यश आलेले नाही.