Notifications

पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी

By PCB Author

October 19, 2018

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी–चिंचवड शहरात सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. गुरूवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे शहरातील ठिक–ठिकाणी झाडे कोसळली. झाड कोसळल्यामुळे चिंचवडमधील एक नागरिक जखमी झाला.