पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय स्टंटबाजीसाठी राष्ट्रवादीकडून मुक्या प्राण्यांचा छळ; सीमा सावळेंनी विरोधी पक्षनेते दत्ता सानेंना झापझाप झापले!   

0
587

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रत्येक विषयावर राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने आज (बुधवारी) सर्वसाधारण सभेत मुक्या प्राण्यांचा राजकीय स्टंटबाजीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ८ ते १० कुत्र्याची पिल्ली बॅग मध्ये बंद करून सभागृहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.  या प्रकरणावरून भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी दत्ता साने यांना सभागृहात झापझाप झापले.दत्ता साने यांनी आपल्या या कृतीचे समर्थन केले. त्यावरून दत्ता साने आणि सीमा सावळे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर महापौर राहुल जाधव यांनी सभा १० मिनिटासाठी तहकूब केली.