पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; पोलिस गुन्हा दाखल करणार

0
3709

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आदेश काढला आहे.

याआदेशानुसार सार्वजनिक चौकात, रस्त्यावर रात्री उशिरा वाढदिवस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या बहुसंख्य तरुण विशेषतः गुन्हेगारी प्रवृतेचे तरुण रात्री उशिरा भर रस्त्यात वाहने लावून केक कापून वाढदिवस साजरा करतात. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हॉर्न वाजवतात, हातात तलवारी घेऊन डीजेच्या तालावर नाचतात. यामुळे वाहतूक कोंडी होते, भांडणे होतात आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो.

यामुळे यासर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी आयुक्त पद्मनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर आणि चौक कात वाढदिवस साजरा करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कलम २९०, १४३, १४३, १४९ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकारामध्ये संबंधितांना एक वर्षाचा कारावास सुद्धा होऊ शकतो.