Pimpri

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार  

By PCB Author

March 05, 2019

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणि रावेत पंपिंग स्टेशन येथील नियमित दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कारणास्तव संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.७) सायंकाळी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. ८) सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महापालिकेने १ मार्चपासून विभागनिहाय पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात बुधवारी(दि.६) आणि शुक्रवारी (दि.८) पाणीपुरवठा बंद असतो. त्यादिवशी त्या भागात नियमित पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात यावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.