Pimpri

पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; भरधाव वेगात ट्रक घुसला झोपडीत

By PCB Author

October 25, 2019

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

इरफान महम्मद जमादार पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनारसी हे त्यांच्या मयत मुलगा आणि पत्नीसह झोपडीत झोपले होते. तसेच इतर व्यक्ती देखील होते. तेव्हा, रात्री दीडच्या सुमारास पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून जवळच असलेल्या झोपडीत घुसला. या अपघातात बोबीचा जागीच मृत्यू झाला, त्याची आई गंभीररित्या जखमी झाली आहे. बोबी बनारसी सोळंकी (११) असे मयत मुलाचे नाव असून बेबी बनारसी सोळंकी (३६) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.  दरम्यान, इतर व्यक्ती बचावल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली  आहे.

मोशी परिसरात चाकणहुन पुण्याच्या दिशेने ट्रिपल सिट काही तरुण स्कुटीवर जात होते. तेव्हा, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कुटीला धडक दिली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.