पिंपरी चिंचवडच्या माजी विरोधी नेत्याला कोरोना

0
357

पिंपरी, दि.25 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी विरोधी पक्षनेता व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे.

माजी विरोधी पक्षनेते असलेले नगरसेवक भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. नगरसेवक, डॉक्टर, परिचारिका, पोलिस असे जबाबदार लोकच बाधित होत चालल्याने खळबळ आहे. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होत होता.

त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला व त्यांच्या माजी नगरसेवक असलेल्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील 52 लोक कोरोना बाधित झाल्याने घबराट आहे. दापोडीतील राष्ट्रवादी कांग्रेस नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.