पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी घेतला शरद पवार यांचा आशिर्वाद

0
370

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी भाजपा नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढत आहे. वारे राष्ट्रवादीच्या दिशेने वाहताना दिसत असल्याने सुमारे २२ नगरसेवक भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीच्या तंबूत प्रवेश करण्यासाठी आतुरलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे भोसरी येथे महापालिकेच्या कार्यक्रमाला आले असताना महापौर माई ढोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यावेळी महपौर यांनी खाली वाकून पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पिंपरी चिंचवड च्या दौऱ्यावर आहेत. काल (दि.१६) भोसरी येथे महापालिकेच्या रुग्णालयासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदार फंडातून १० आयसीयू बेडचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण होते.

शहराच्यावतीने महापौर माई ढोरे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. या मुळे उपस्थितांमध्ये तर्क वितरक लढवायला सूरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगान उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी भाजपचे काही विद्यमान नगरसेवक संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. आता आज झालेल्या प्रसंगामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. भाजपाचे रथीमहारथी राष्ट्रवादीच्या संपर्कात असून पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी आता कोणीही थेट पक्षांतर करत नाहीत. दरम्यान, भाजपा नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे, माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी तसेच भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसवेक कैलास बारणे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.