Notifications

पिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

By PCB Author

December 18, 2018

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) –  रावेत पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक कामे, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कामे, विद्युत विभागातील नियमित दुरूस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी (दि. २०) सायंकाळी  शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि.२१) पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.