पिंपरीत ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी मुलीचे लग्न; समाजाचा विरोध; मुलीच्या आईने पोलीस आयुक्तांकडे मागीतले संरक्षण

0
575

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच येत्या गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी कंजार भाट समाजातील एका मुलीचे पिंपरीत लग्न आहे. या लग्नाला त्यांच्या समाजातील काही लोकांचा विरोध असल्याने कुठल्याही प्रकारची हिंसक घटना घडू नये तसेच विवाह व्यवस्थित पार पडावा म्हणून मुलीच्या आईने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे  संरक्षणाची मागणी केली आहे.

सदरचा विवाह कंजारभाट पध्द्तीने होणार असून कंजारभाट समाजातीलच काही तरुण त्याच्या सहकार्यासह या विवाह सोहळ्यात गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विवाहाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. २०१८ मध्ये पिंपरी चिंचवड परिसरातच कंजारभाट समाजातील विवाह पार पडत असताना जातीतील प्रथा आणि परंपरांना विरोध दर्शवणाऱ्या तरुण तरुणींना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या समाजातील प्रथांना विरोध करण्यासाठी तरुण तरुणींनी मोठी मोहीमच उभारली आहे.  यामुळे पोलिस काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.