पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच येत्या गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी कंजार भाट समाजातील एका मुलीचे पिंपरीत लग्न आहे. या लग्नाला त्यांच्या समाजातील काही लोकांचा विरोध असल्याने कुठल्याही प्रकारची हिंसक घटना घडू नये तसेच विवाह व्यवस्थित पार पडावा म्हणून मुलीच्या आईने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.