Others

पिंपरीत वेब चॅनलचे पत्रकार असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या बोगस पत्रकारांना अटक

By PCB Author

June 06, 2018

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – शहरात शबनम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. थेरगाव) आणि मोहमद शराफतहुसेन अली ( वय २४,रा.थेरगाव) असे या दोन बोगस पत्रकारांची नावे आहेत. वाकड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत होते. त्याच्याकडे शबनम न्यूजचे ओळखपत्र तसेच इतरही विवध संघटनेचे नियुक्ती पत्र पोलिसांना मिळाली आहेत. वाकडमध्ये एका चैन चोरी प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरी करणारा शबनम न्यूज या वेब चॅनलचा पत्रकार नसीम सादिक उस्मानी असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता या दोघांनी वाकडमध्ये तीन आणि सांगवी परिसरात दोन चोऱ्या केल्याचे कबूल दिली. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी  वर्तवली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.