पिंपरीत मोबाईल अॅक्सेसरीजचे दुकान जळून खाक

0
560

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी साई चौकातील आनंद मोबाईल मार्केट या मोबाईल अॅक्सेसरीजच्या दुकानाला आज (मंगळवार) दुपारी सव्वाएकच्या सुमारास आग लागली.

घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर अग्निशमन केंद्रातील दोन पाय टेंडर, भोसरी, प्राधिकरण आणि तळवडे असे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटातच आग आटोक्याकत आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. तर दुकानातील काही साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत कुठलीही जिवीत हानी नाही. आग आटोक्यात आणण्यात अशोक कानडे, सरोष फुंडे, निळकंठ दुबे, संदीप जगताप, महेंद्र पाटील, प्रतीक कांबळे, अमोल खंदारे असे एकूण २० जवानांनी प्रयत्न केले.