Pimpri

पिंपरीत माहेरहून व्यावसायासाठी पैसे न आणल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य

By PCB Author

March 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – माहेरहून व्यावसायासाठी दहा लाख रुपये न आणल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीसोबत दाढी करण्याच्या झिरो मशीनने अनैसर्गिक कृत्यू करुन लैंगिक छळ केला. तसेच सासरकडच्या मंडळींनी देखील त्रास दिला. ही घटना मे २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान पिंपरीत घडली.

याप्रकरणी पिडित ३० वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती गिरीष तुलसीदास चांदवाणी (वय ३२), सासू दया तुलसीदास चांदवानी (वय ६५) आणि सासरे तुलसीदास चांदवाणी (वय ७०, सर्व रा. पिंपरी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत आरोपींनी त्यांची ३० वर्षीय सुनेचा छळ केला. तसेच माहेरहून व्यावसायासाठी दहा लाख रुपये न आणल्याच्या कारणावरुन तिच्या पतीने दाढी करण्याच्या झिरो मशीनने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यू करुन लैंगिक छळ केला. याप्रकरणी सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निमगीरे तपास करत आहेत.