Pimpri

पिंपरीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुकबधीर इसमास अटक

By PCB Author

April 12, 2019

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेसोबत मुकबधीर इसमाने पॅन्ट काढून अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१०) रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपरीतील देवधर हॉस्पीटल जवळ घडली.

याप्रकरणी पिडित ४० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश सेवकराम क्रोडनानी (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या मुकबधीर व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ४० वर्षीय महिला या त्यांच्या बिल्डिंगच्या खाली असलेल्या पाण्याच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मुकबधीर राजेश तेथे आला. त्याने महिलेसमोर त्याची पॅन्ट काढून अश्लिल वर्तन केले. तसेच त्यांचा हात पकडून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी राजेश याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक निमगीरे अधिक तपास करत आहेत.