पिंपरीत भाजप युवा मोर्चाने पाकिस्तानचा झेंडा जाळला; पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

757

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. १५) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनुप मोरे, भाजयुमोच्या सरचिटणीस वैशाली खाडये, अजित कुलथे, दिपक नागरगोजे, प्रविण सिंग, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे शहर उपाध्याक्ष मधुकर बच्चे, देवयानी भिंगारकर, अमित गुप्ता, विवेक महाजन, तेजस्वीनी कदम, योगेश सोनावणे, किशोर ब्राम्हणकर, राहुल शिंदे, अमोल दामले, मिथुन कुमार, मिहीर झा, सागर फुगे, भागवत मुंडे, योगेश भागवत, गणेश जवळकर, गणेश संभेराव, साई कोंढरे, अभिजीत बागुल, यश तावरे, शुभम चॉंद, दिलीप गोसावी आदी उपस्थित होते.