पिंपरीत भाजप युवा मोर्चाने पाकिस्तानचा झेंडा जाळला; पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

0
465

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. १५) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.