पिंपरीत भर दिवसा साडेचार लाखांची घरफोडी

0
267

मोरवाडी,दि.13(पीसीबी) : भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 64 हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.9) दुपारी दीड ते साडेपाच या वेळेत संत तुकाराम नगर, मोरवाडी येथे घडली.

सॅमसंग बेजामीन शेफर्ड (वय 55, रा. संत तुकाराम नगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी याबाबत सोमवारी (दि. 12) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेफर्ड यांचे घर शुक्रवारी दुपारी दीड ते साडेपाच वाजताच्या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत