पिंपरीत बोगस मतदान करणारे परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात   

0
871

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) –  बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान करणाऱ्या  ५ परप्रांतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोगस मतदान करत असल्याचा प्रकार  पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गाव येथील विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक ३०३ येथे समोर आला. याबाबतची तक्रार आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे केली आहे.    

बोगस ओळखपत्रे दाखवून ५ परप्रांतीय मतदान करत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी  मतदान केंद्रांवर जाऊन  ५ परप्रांतीयांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

मराठी मतदारांच्या नावावर आम्ही मतदान केले आहे, अशी कबुली  या परप्रांतीयांनी दिली आहे. या  प्रकारामुळे पिंपरी गावातील  मतदान केंद्रावर  दक्षता घेण्याची सुचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी  गर्दी केली आहे.