Pimpri

पिंपरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण

By PCB Author

January 27, 2019

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त  पिंपरी-चिंचवड शहरातील मदनलाल धिंग्रा या मैदानावर ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थानी एकत्र येऊन देशभक्तीपर सामुहिक गीत सादर केले.  पिंपरी-चिंचवड महा पालिका, क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  

माध्यमिक आणि महापालिकेच्या  प्राथमिक अशा ऐकून १०५ शाळांनी यात  सहभाग घेतला होता. यावेळी ‘आता उठवू सारे रान’, ‘जहाँ डाल डाल पर’, ‘उठा राष्ट्रविर हो सज्ज व्हा’, अशी   तीन देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव,आयुक्त श्रावण हर्डीकर,सत्तारूढ नेते एकनाथ पवार,आमदार महेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक हे सकाळी साडेसहा वाजल्यापासून मैदानावर आले होते. त्यामुळे देशभक्तीपर गीत सादर झाल्यानंतर अनेक विद्यार्थाना चक्कर आली. संबंधित १४ ते १५ विद्यार्थाना स्टेज च्या बाजूला बसवण्यात आले त्यांना राजगिऱ्याचा लाडू खाण्यासाठी देण्यात आले. मात्र रुग्णवाहिका असताना देखील त्यात औषध नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत.विद्यार्थाना तसेच बसवण्यात आले.