Pimpri

पिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक

By PCB Author

October 23, 2018

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – बेकायदेशिररित्या गुटखा घेवून जात असलेला टेम्पो पिंपरी पोलिसांनी पकडला आहे. यावेळी टेम्पोमधील तब्बल ४० लाख ९० हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २२) चिंचवड स्टेशन येथे रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

अस्पक मोहम्मद शेख (अंधेरी रोड, ग्रेटर, मुंबई) आणि जाफर फेयाज शेख (कुर्लावेस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथून एका टेम्पोतून गुटखा जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टेम्पो पकडला. यावेळी टेम्पोमध्ये गोवा गुटख्याची एक हजार बॉक्स आढळली. पोलिसांनी यावेळी दोघांना अटक केली. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.