पिंपरीत नराधम बापाकडून ७ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

0
530

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – बापाने पोटच्या मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. 

याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासू आणि दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आरोपी पतीशी २०१० साली लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी महिलेला संगनमत करून मारहाण व शिवीगाळ करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने फिर्यादी महिलेला अश्लील व्हिडियो दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच पतीने त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला देखील अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.