Pimpri

पिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना

By PCB Author

October 19, 2018

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पिंपरीतील सेक्टर क्रमांक १० मध्ये आज (शुक्रवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना करण्यात आले. यावेळी बौध्दाचार्य बापुसाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत बुद्धविहारामध्ये बुद्धवंदना घेण्यात आली.

यावेळी अध्यक्ष फारूकभाई कुरेशी, अॅड. बी. के. कांबळे, अॅडय अशोक बडेकर, सुर्यकांत गायकवाड, रामकिशन माने, जया पाटील, देविदास कांबळे, फिरोज कुऱेशी, धुराजी शिंदे, गौस कुरेशी कादीर कुरेशी, जाफर मुल्ला, इम्ररान बिजापुरे, मुजू बेंळंबे, आयपाझ कुरेशी, गुलाब पाटील, शिवलींग भोसले, सारिका तामचिकर, आदी उपस्थित होते. तर संतोष कसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.