पिंपरीत दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
676

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 29) पिंपरी उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आयान निसार कुरेशी (वय 19, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शारुख कय्यूम कुरेशी (वय 25), वक्कास युसुफ कुरेशी (वय 19), अजर आमीद कुरेशी (वय 24), मुक्तार रज्जार कुरेशी (वय 48), अकबर सादिक कुरेशी (वय 24), इस्माईल बशीर कुरेशी (वय 36), राजू रज्जाक कुरेशी (वय 40, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयान आणि त्यांचा मामा अस्लम कुरेशी असे दोघेजण फिर्यादी यांच्या मावशीच्या मुलाच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यासाठी पिंपरी पुलाखाली गेले. त्यावेळी आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण केली. आरोपी वक्कास याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी राजू हा लाकडी दांडके घेऊन मारण्यासाठी पळत आला असे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात इस्माईल बशीर कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फैज जमील कुरेशी (वय 21), मुबीन शब्बीर कुरेशी (वय 22), आयान निसार कुरेशी (वय 21), शाबीर मंजूर कुरेशी (वय 29), वाहिद मजीद कुरेशी (वय 32), खालिद अकील कुरेशी (वय 22), इर्शाद झाकीर कुरेशी (वय 29), जमिल अजीज कुरेशी (वय 47), फैय्याज गफूर कुरेशी (वय 48), मंजूर वाहब कुरेशी (वय 56, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पुलाखाली फिर्यादी यांचा पुतण्या शाबीर कय्यूम कुरेशी याला सर्व आरोपी मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी फिर्यादी यांचा दोघांना धक्का लागला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून सत्तुरने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.