पिंपरीत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

0
1737

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तिघाजणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.१८) सकाळी दहाच्या पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ घडली.

ओंकार बाळु सरोदे (वय १८, रा. फ्लॅट नं. १४, हरिओम सोसायटी काकडे पार्कजवळ, चिंचवडगाव) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आशुतोष वाघिरे (वय १९), ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघिरे (वय २०, रा. फ्लॅट नं.३०१, श्रीधर अपार्टमेंट पिंपरीगाव) आणि सुशिल शिंदे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार सकाळी दहाच्या पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ ओंकार उभा होता. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आशुतोष, ऋषिकेश उर्फ मोन्या आणि सुशिल या तिघांनी ओंकारवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आणि फरार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपी ऋषिकेश याला अटक करण्यात आली होती. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तर इतर दोघे आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.