पिंपरीत गुरवारी सायंकाळी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

0
382

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : पवना नदीवरील रावेत बंधारा येथील अशुद्ध जलउपसा आणि निगडी- प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

शहरातील जलवाहिन्या व पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीही केली केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 28) पाणीपुरवठा व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी केवळ सकाळचा पाणीपुरवठा होईल. सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. शुक्रवारी (ता. 29) सकाळचा पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्‍यता, महापालिका पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.