Pimpri

पिंपरीत गणेश विसर्जनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचे पदसंचलन

By PCB Author

September 20, 2018

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – गणेश विसर्जनाच्या पाश्वभूमीवर पिंपरीतील शगुन चौक ते भाटनगर दरम्यान आज (गुरुवार) सायंकाळी चारच्या सुमारास पिंपरी पोलिस ठाण्यातील पथकाने पदसंचलन केले.

येत्या रविवारी (दि. २३) गणेश विसर्जन असल्याने पिंपरीत मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागातून गणेश मंडळे आणि नागरिक विसर्जनासाठी येतात. यामुळे आज पिंपरी पोलिसांनी शगुन चौक, साई चौक, डिलक्स चौक, विसर्जन घाट, भाटनगर या मार्गे पदसंचलन केले. तसेच विसर्जन मार्गाचा आणि विसर्जन घाटाचा देखील आढावा घेतला. पोलिसांनी विसर्जन व्यस्थित पार पढावे म्हणून नियोजन देखील केले आहे.

यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील, पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे,  पोलिस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वसजीत खुळे, ११ पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक, ९१ पोलिस कर्मचारी आणि एक एसआरपीएफ पथक उपस्थित होते.