पिंपरीत कत्तलीसाठी गाय आणि वासराला घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

0
778

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गाय आणि वासराची सुटका करुन तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी पोलीसांनी बुधवारी (दि.५) रात्री अकराच्या सुमारास पिंपरी पुलावर केली.

अकबर शेरमहमद खान (वय ३४, शांती कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) आणि त्याचे दोन साथीदार बाबू उर्फ गुलाम उर्फ जिलानी मोहम्मद हुसेन कुरेशी (वय १८) आणि प्रकाश भोटे (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. त्याच्याविरोधात प्राणी रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, बुधवारी पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पिंपरी येथे गाय आणि वासराला कत्तलीसाठी आणणार आहेत. यावर पिंपरी पोलिसांनी पिंपरी पुलावर सापळा रचला. पोलिस वाहनांची तपासणी करत असताना टाटा एस वाहन (क्र.एमएच/११/सीएच/०८१८) हा टेम्पो आढवला आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक गाय आणि एक वासरु आढळून आले. पोलिसांनी यावर तिघे आरोपी अकबर, बाबु आणि प्रकाश यांच्याकडे कत्तीसाठी नेत असलेल्या जनावरांचा वाहतूकीचा परवाना आणि खरेदि विक्रीच्या पावत्यांची मागणी केली. मात्र आरोपींकडे दोन्ही नव्हते. आरोपींनी वाहतूकीस वापरलेला टेम्पो, गाय आणि वासरु असा एकूण ३ लाख २० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.