पिंपरीत अज्ञातांकडून एकावर ब्लेडने वार

0
1067

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – दारु पीत बसलेल्या एका इसमावर दोघा जणांनी ब्लेडने वार करुन जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१८) रात्री पावनेदहाच्या सुमारास पिंपरीतील सम्राट चौकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात घडली.

विकास हनुमंत गायकवाड (वय २४, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे ब्लेडचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावनेदहाच्या सुमारास तक्रारदार विकास गायकवाड हा तरुण पिंपरीतील सम्राट चौकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात दारु पित बसला होता. यावेळी दोन अज्ञात इसमांनी विकास याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच विकास याच्या छातीवर ब्लेडने वार करुन आरोपी पसार झाले. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.