Pimpri

पिंपरीतील सिटी मॉलमध्ये सात लाखांच्या ऐवजाचा अपहार; मॅनेजर विरोधात गुन्हा

By PCB Author

May 12, 2019

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – सिटी मॉलमधील रोख रक्कम आणि विविध प्रकारचे कपडे असा एकूण ७ लाख ३८ हजार ७६६ रुपयांच्या ऐवजाचा अपहार केल्याने मॉलच्या मॅनेजर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहाराची घटना १ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या दरम्यान पिंपरीतील सिटी मॉलमध्ये घडली.

याप्रकरणी दत्तात्रय अशोक अलमेर (वय ३६, रा. वाढेबोलाई, बालाजी निसर्ग, डि विंग प्लॅट नं.४०३, हवेली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मॉलमधील मॅनेजर दानिश खान (वय २६, रा. पंचवटी पाषाण, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश हा पिंपरीतील सिटी मॉलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत होता. १ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या दरम्यान दानिश याने मॉलमधील रोख रक्कम आणि लि कंपनीचे जर्किंग, जिन्स, टी शर्ट असा एकूण ७ लाख ३८ हजार ७६६ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी दानिश विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कामठे तपास करत आहेत.