Pimpri

पिंपरीतील सराईत गुन्हेगार मनोज विटकर याची एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी

By PCB Author

February 08, 2019

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दहा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार मनोज म्हसुकांत विटकर (वय २७, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांच्यावर पिंपरी पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

मनोज विटकर याच्यावर या पूर्वी देखील मोक्का अंतर्गत कारवाई करुन तीन वर्षांकरिता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहातून सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा नेहरुनगर-विठ्ठलनगर परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगल, तोडफोड, खंडणी, दहशत पसरवणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.