पिंपरीतील शिक्षिका गोळीबार प्रकरणी अॅड. सुशील मंचरकर यांना अटक

0
766

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक वसाहतीत ९ जून रोजी एका शिक्षिकेवर दुचाकीवरून आलेल्या अत्रातांनी गोळीबार केला. या खूनी हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. सुशील मंचरकर यांना काल (शुक्रवारी) सायंकाळी गवळीगाथा येथून अटक करण्यात आली आहे.

शीतल सिकंदर (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे. या हल्यात हि महिला बचावली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ९ जून रोजी पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक वसाहतीत शितल सिकंदर या महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. गोळीबार प्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, तुरूंगातून आरोपी पळवून लावणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांना मोक्का लावण्यात आला आहे. ९ जून रोजी महिलेवर झालेल्या खुनी हल्ल्याच्या संदर्भात पिंपरी पोलिस त्यांचा शोध घेत होते. मंचरकर हे गवळीमाथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. पोलिस तपास करत आहेत.