पिंपरीतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढवा

0
1921

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरीतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यन्त दोन्ही बाजूनी रस्त्यांचे रुंदीकरन वाढवा, अशी मागणी जाणीव फौंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी मुख्य बाजार ही शहरातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखली जाते. दररोज हजारो नागरीक येथे खरेदी करीता येतात. सना – सुदीच्या दिवसात बाजारात लाखोंच्या संखेने गर्दी होते. परंतू, रस्ता अरुंद असल्याने वाहन कोंडीची समस्या कायम भेडसावत असते. त्याचत नागरिकांच्या गर्दीमुळे चेंगरा- चेंगरी होवून अनेक जन जखमी झाल्याच्या घटना घडतात.

महत्वाची बाब म्हणजे पिंपरीतील बाजारपेठेत अग्निशामक दलाचे वाहन अथवा रुग्णवाहिका तसेच तस्यम प्रकारच्या सुविधा पुरवणेसाठी अडथळा निर्माण होतो. त्यांमुळे, नागरीकांच्या समस्या लक्षात घेऊन आपण शहर अभियंता, नगररचना विभाग यांना आदेश देऊन पिंपरीच्या मुख्य बाजारपेठेतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यंतच्या दुकानाच्या दोन्ही बाजूनी किमान ५ फुटापर्यंत कटिंग करून रस्त्यांची रुंदी वाढवावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.