पिंपरीतील मिलिंदनगरमधील आगीत पाचजणांना भाजले; सहा दुचाक्या जळून खाक

0
737

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरीतील मिलिंदनगर येथे असलेल्या कपिला वास्तू सोसायटीमध्ये आज (शुक्रवार) पहाटे चारच्या सुमारास इमारतीसमोर पार्क केलेल्या सहा दुचाक्यांना अचानक आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती कि, आगीची झळ चौथ्या मजल्यापर्यंत पोहचून इमारतीतील पाचजण भाजले गेले.

या घटनेची माहिती पोलीसांसह अग्निशमन विभागाला देण्यात आली. आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. मात्र या घटनेत आग लावली गेली कि शॉर्टसर्किट मुळे आग लागली याबाबत सभ्रम आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आगीत सहा दुचाक्या आणि काही घरातील सामान असे एकूण चार लाखांचे नुकसान झाले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.