Pimpri

पिंपरीतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

By PCB Author

September 25, 2018

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – थोर विचारवंत भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात आज (मंगळवारी) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी पंडितजींच्या ‘एकात्मता मानवतावाद’ या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, नगरसेविका आनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, नगरसेवक बाबू नायर, नामदेव ढाके, विजय शिनकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, मंडलाध्यक्ष अजय पाताडे, किशोर ब्राम्हणकर, शिवदास हांडे, प्रदीप बेंद्रे, आशा काळे, गीता महेंद्रू, भीमा बोबडे, कुमार कोनकर, पाटीलबुवा चिंचवडे, आनंदा पाटील, नंदू कदम, मनोज पवार, कार्यालय सचिव रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते.