पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे कामगार सभागृह कामगारांसाठीच ठेवण्याची मागणी

0
988

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याने कामगारांसाठी उभारलेले पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे कामगार सभागृह आरोग्य खात्यास न देता ते कामगारांसाठीच ठेवावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील कामगारांसाठी पिंपरी येथे श्रमिकांचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने कामगार भवन बांधलेले आहे. त्यामध्ये कामगारांकरीता वाचनालय असून त्यात विविध उपक्रम पार पडतात. महापालिकेला ३० ते ४० टक्के कर कामगारांकडून मिळतो. उर्वरित कर कामगारनगरीतील विविध उद्योगांमधून प्राप्त होतो.

परंतू, महापालिकेने कामगार इमारतीतील खालचे गाळे वाहतूक पोलिस यंत्रणेच्या कार्यालयीन कामकाजासाठी देले आहे. शिवाय उर्वरित राहिलेले गाळे आरोग्य खात्याच्या कार्यालयास देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पिंपरीतील हे कामगार सभागृह आरोग्य खात्यास न देता ते कामगारांसाठीच राखीव ठेवावे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.