Pimpri

पिंपरीतील तडीपार आरोपीला घातक हत्यारासह अटक

By PCB Author

October 03, 2018

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या पिंपरीतील रॅकॉर्डवरील सराईत गुन्हेगार भुपेंद्र उर्फ सनी चरणजितसिंग गिल (वय ३३, रा. राजीवगांधीनगर, पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी कोयत्यासह अटक केली आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे आणि स्वत: जवळ घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी भुपेंद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुपेंद्र हा रेकॉर्ड वरील सराई गुन्हेगार असून त्याला डिसेंबर २०१६ मध्ये पोलीस उप आयुक्त परीमंडळ-३ यांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र हा तडीपारीचा आदेशाचा भंग करुन तो पुन्हा पिंपरीत आला. तसेच पोलिसांनी त्याला कोत्यासह पिंपरीतील शास्त्रीनगर सुदर्शन बुक स्टॉल येथून अटक केली. त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे आणि स्वत: जवळ घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.