Pimpri

पिंपरीतील डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मुतखडा व्याधीवर शुक्रवारी मोफत तपासणी शिबीर

By PCB Author

March 07, 2019

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने शुक्रवारी (दि. ८) मुतखडा या व्याधीवर मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबीर होईल. या शिबीरात मुतखडा व्याधीवर मोफत तपासणी करून तीन दिवसांची औषधे मोफत दिली जाणार आहेत. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या तसेच या आजारावर आयुर्वेद उपचाराचा प्रचार व प्रसार करणेचे उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

त्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. शिबीराच्या अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी भारती मराठे (9921737277) यांच्याशी संपर्क साधावा.